शब्दांच्या जाती
मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत.
1नाम (noun)
2सर्वनाम (pronoun) 3विशेषण (adjective) 4क्रियापद (verb) 5क्रियाविशेषण (adverb) 6उभयान्वयी अव्यय (conjunction)
7शब्दयोगी अव्यय (prepositions) 8केवलप्रयोगी अव्यय (exclaimatorywords)
१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
1नाम (noun) 2सर्वनाम (pronoun) 3विशेषण (adjective) 4क्रियापद (verb)
२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
5क्रियाविशेषण (adverb) 6उभयान्वयी अव्यय (conjunction)
7शब्दयोगी अव्यय (prepositions) 8केवलप्रयोगी अव्यय (exclaimatorywords)
नाम :- खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांना’नाम’असे म्हणतात.
नामाचे प्रकार :-
१. सामान्य नाम २. विशेष नाम ३. भाववाचक नाम
१. सामान्य नाम :-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम होय. उदा. मुले,मुली,शाळा,पुस्तक,ई.
२.विशेष नाम :-
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा. रामदास,गंगा,यमूना,हिमाचल इ.
३.भाववाचक नाम :-
ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा,भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. उदा.आनंद,दु:ख,ई.
सर्वनाम:- नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.
सर्वनामांचे प्रकार[संपादन]
सर्वनामांचे एकंदर सहा प्रकार मानतात :
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
१) पुरुषवाचक सर्वनाम :[संपादन]
बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात
- बोलणाऱ्यांचा
- ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा
- ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा.
व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.
- बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः
- ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा.तू, तुम्ही, आपण, स्वतः
- ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे उदा.तो, ती, ते, त्या
२) दर्शक सर्वनामे :[संपादन]
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनामे वापरले जातात त्यास ‘दर्शक सर्वनाम’ असे म्हणतात.उदा. हा, ही, हे, तो, ती, ते. उदा. ते घर सुंदर आहे.
३) संबंधी सर्वनामे :[संपादन]
वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी (तो-ती-तें-ते-त्या) संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना ‘संबंधी सर्वनामे’ असे म्हणतात. उदा. जो – जी – जें, जे, ज्या. हिंदी-इंग्रजीत आधी ‘तो-ती-तें-ते-त्या’ येते आणि मग ‘जो – जी – जें, जे, ज्या’. मराठीत तसे होत नाही.
४)प्रश्नार्थक सर्वनामे:[संपादन]
ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’म्हणतात. उदा. कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.
५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे :[संपादन]
कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.
- कोणी कोणास हसू नये.
- त्या पेटीत काय आहे ते सांगा.
या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.
६)आत्मवाचक सर्वनामे[संपादन]
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. उदा.
- मी स्वतः त्याला पाहिले.
- तू स्वतः मोटार हाकशील का?
- तो आपण होऊन माझ्याकडे आला.
- तुम्ही स्वतःला काय समजता?
आपण व स्वतः – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक :-
आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.
विशेषण
विशेषण:- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या् शब्दास विशेषण असे म्हणतात.
उदा. चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या विशेषण – चांगली, काळा, पाच विशेष्य – पिशवी, कुत्रा, टोप्या विशेषणाचे प्रकार : गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण
1. गुणवाचक विशेषण : नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. उदा. हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश
2. संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत. गणना वाचक संख्या विशेषण क्रम वाचक संख्या विशेषण आवृत्ती वाचक संख्या विशेषण पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण
3. सार्वनामिक विशेषण : सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदा. हे झाड ती मुलगी तो पक्षी मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो.
क्रियापद
क्रियापद:- वाक्यामधील क्रिया दर्शविणार्यार ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो. मुलांनी खरे बोलावे. आमच्या संघाचे ढाल जिंकली.
क्रियापदांचे प्रकार : क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. सकर्मक क्रियापद अकर्मक क्रियापद 1. सकर्मक क्रियापद – ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा. गाय दूध देते. पक्षी मासा पकडतो. गवळी धार काढतो. राम आंबा खातो. अनुराग निबंध लिहितो. आरोही लाडू खाते. 2. अकर्मक क्रियापद – ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्मांची आवश्यकता नसते. म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना ‘अकर्मक क्रियापदे’ असे म्हणतात. उदा. मी रस्त्यात पडलो. तो बसला. आज भाऊबीज आहे. तो दररोज शाळेत जातो. (टीप : जेव्हा क्रिया कोणावर होते व क्रिया करणारा/करणारी कोण असे प्रश्न विचारले असता दोन्ही प्रश्नांचे उत्तर हे एकच सारखीच मिळतात त्याला ‘अकर्मक क्रियापद’ असे म्हणतात.)
क्रियाविशेषण
क्रियाविशेषण :-जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण म्हणतात.
- स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
- कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
- परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
- रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .
उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय :-दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात.
प्रकार[संपादन]
उभयान्वयी अव्ययांचे दोन प्रकार पडतात.
- प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य)
- समुच्चयबोधक
- विकल्पबोधक
- न्यूनत्वबोधक
- परिणामबोधक
- गौणत्वसूचक (मिश्र वाक्य)
- स्वरूपबोधक
- उद्देशबोधक
- संकेतबोधक
- कारणबोधक
शब्दयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यये :- शब्दाला जोडून येणारे अव्यय. उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्यात शब्दांना शब्दयोगी अव्ययेअसे म्हणतात. उदा. सायंकाळी मुले घराकडे गेली. शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता. आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
केवलप्रयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय:- मनुष्याच्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात, त्यांना उद्गारवाची शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
- प्रधानत्वसूचक (संयुक्त वाक्य)
Leave a Reply