वायु प्रदूषण

वायु प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड (co), हायड्रोकार्बन्स (HC) व नायट्रोजन ऑक्साईडची (NO) उच्च पातळी निर्माण करतात. बांधकाम कार्ये, खराब रस्ते व जीवाश्म इंधनांचे ज्वलन, धुळीच्या (पार्टीक्युलेट मॅटर) प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. निवासी व वाणिज्यिक कार्ये देखिल वायु प्रदूषणास हातभार लावतात.

वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणार्‍या प्रदूषणात कार्बनमोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल यामुळे दोन तृत्यांश सल्फर डायऑक्साइड तयार होतो. पेट्रोरसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते.

अंतराळात जाण्यासाठी जो अग्निबाण वापरतात त्याच्या धुरातूनसुध्दा क्लोरोफ्ल्युरोकार्बन सारखी संयुगे वातावरणात कोणाशीही संयोग करत नाहीत, पाण्यात विरघळत नाहीत. किंवा समुद्रात सुध्दा शोषून घेतली जात नाहीत. अशाच प्रकारची संयुगे आवाजापेक्षा वेगाने जाणार्‍या विमानातुनसुध्दा बाहेर टाकली जातात. अग्निबाण व ही विमाने स्थित्यंतरामधून प्रवास करतात. त्यामुळे त्यांचा धुर वातावरणाच्या या स्तरात मिसळला जातो. येथे ही संयुगे(क्लोरोफ्ल्युरो कार्बन) प्राणवायूच्या अणुबरोबर संयोग करून क्लोरीनचा अणू वेगळा करतात. हा क्लोरीनचा अणू ओझोनच्या रेणूशी प्रक्रिया करतो व त्याला तोडतो. यामुळे ओझोनचे पृथ्वी भोवतीचे कवच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाहनामुळे होणारे प्रदूषण हे सर्वात जास्त प्रमाणात असते. वाहनांच्यामुळे होणार्‍या प्रदूषणात कार्बनमोनोक्साईडचे प्रमाण दोन तृत्यांश इतके असते. तर हायड्नेकार्बन आणि नायट्न्स ऑक्साईड निम्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल यामुळे दोन तृत्यांश सल्फर डायऑक्साइड तयार होतो. पेट्रोरसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*